In this Ghazal the poetess says to her dear flower to sing and dance with rhythm, because she wants to see her flower happy forever.
गायचे तालात आता तू फुला
कैद हो श्वासात आता तू फुला
घोळुनी शब्दात थोडी शर्करा
बोलरे कानात आता तू फुला
कारखाना सतत हा चालूच का
ये जरा वाऱ्यात आता तू फुला
हलव तू हातास आणी पायही
उतरना पाण्यात आता तू फुला
नाद भरली लहर सुंदर नाचते
फुंक तिज प्राणात आता तू फुला
बाग माझी फुलत राहो बावरी
हो विजेची पात आता तू फुला
चारुता हृदयी ‘सुनेत्रा’ उमलली
साद देना गात आता तू फुला
वृत्त- गा ल गा गा, गा ल गा गा, गा ल गा.