गेंद गोलसर कुंकू वर्णी गुलाबपुष्पांचा
लाल जर्द जणु झेंडू चेंडू रुबाब पुष्पांचा
घोळुन परिमल घोळामध्ये झाला गडद किती
झोक जांभळा शौक गुलाबी शबाब पुष्पांचा
लाचारी नच कर्तव्याचा धर्म मार्ग मिळता
नोंदवून घे खतावणीतिल जवाब पुष्पांचा
शांत पहुडल्या निळ्या झुल्यावर पारुल सुमन कळ्या
वाटिकेतल्या झुडुपांवरती जुराब पुष्पांचा
मोक्षस्थळीच्या वाटेवरती कुसुमांकित वेली
खरा सुनेत्रा हिरा कोंदणी किताब पुष्पांचा