तुझी चूक तुजला कळाया हवी
तुझ्या अंतरी सळसळाया हवी
किती दिवस अजुनी तुझा घोळ हा
तुझी जून वांच्छा जळाया हवी
लवंगांत चिकनी सुपारी कळी
तुझे पान ताजे वळाया हवी
नयन नेत्र लोचन उमलण्या पुरी
तुझा मान जपण्या तळाया हवी
झरा निर्झराला मिळोनी नदी
तुझ न गाव पण खळखळाया हवी