रंगात रंगुनी मी जाणार पंचमीला
समृद्ध फाल्गुनाच्या बघुनी सुगंधलीला
कोकीळ तान घेता आंब्यावरी सुखाने
वेळू बनात वारा गाईल संगतीला
येई वसंत मित्रा भिजवावयास तुजला
मिटवून टाक शंका सांगेल मैत्रिणीला
अंगावरी सरी घे होण्यास चिंब पुरते
झरतील प्रेमधारा मातीत पेरणीला
मृदगंध कोंडलेला वार्यासवे निघाला
मी दूत प्रेमिकांचा सांगेल साजनीला
वृत्त – गा गा ल गा, ल गा गा, गा गा ल गा, ल गा गा,