गडगड गगनी हसतो कोण
नभात मोती दळतो कोण
ढगात कापुस भरतो कोण
घनामधूनी झरतो कोण
पहाट फुलता वाटत मोद
फुलांमधूनी हसतो कोण
निळ्या समुद्रा भेटायास
नदीत लाटा भरतो कोण
अंधाराला भेदायास
विजेस लखलख म्हणतो कोण
जहाज गलबत हलवायास
शिडात वारा भरतो कोण
वळीव येता भिजावयास
चल चल मजला म्हणतो कोण
मात्रावृत्त – (८+७=१५ मात्रा)