भारत भूमी माता माझी जिनानुयायी पिता
भारत भूमी मारे बाजी जिनानुयायी पिता
धर्म अहिंसा हृदयामध्ये जपण्यासाठी सदा
भारत भूमी लढण्या राजी जिनानुयायी पिता
मिया नि बीबी असता राजी लग्नासाठी जिथे
भारत भूमी होते काझी जिनानुयायी पिता
वृद्ध जाहली जरी वयाने कुंतल पिकले जरी
भारत भूमी सदैव ताजी जिनानुयायी पिता
कटू विषासम सत्य पचवुनी जगण्यासाठी पुन्हा
भारत भूमी तरुणी आजी जिनानुयायी पिता
गझल मात्रावृत्त (मात्रा २७)