१)शास्त्र ..
सहज सुचतं काहीतरी
वाचत वाचत बरसती सरी
इजा बिजा आणि तिजा
शास्त्र वाचत घेते मजा
सुनेत्रा घेत नाही रजा
ग्रंथ देत नाही सजा
….
२)मुक्तक .. घोळ
भक्ति शक्ति जेथ नांदतात संग
सत्त्यता शिवात सौंदर्यात
जात पात भेद संपवून घोळ
सम्यक दृष्टि जीव चालतात संग
..
३)तीनशेरांचे मुक्तक .. उपाधी
घटना कुठली आधी नंतर
कारण करुणा व्याधी नंतर
मतलब माझा मला कळाला
संधी मिळता साधी नंतर
योग सुनेत्रा त्रिशेर मुक्तक
मम मक्त्यात उपाधी नंतर