कारण – KAARAN(REASON)


कारण चपखल रुतते आहे
कारण त्याचे सलते आहे

शब्द चोरटे गाली हसता
कारण नकळत फिरते आहे

चोरांच्या उलट्या बोंबांनी
कारण तिळतिळ तुटते आहे

पुफ्फ सुगंधी दरवळणारे
कारण सौरभ झरते आहे

मधमाशीसम बछड्यांसाठी
कारण कारण लढते आहे

घुम्या वेदना घुमत राहती
कारण पुरुनी उरते आहे

भरून पिंडी आनंदाश्रू
कारण जखमा भरते आहे

क्षण क्षण बाकी जगे सुनेत्रा
कारण हृदयी खिरते आहे

 

 

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.