आभाळ मेघ छाया
पाऊस देह छाया
रानात ऊस नारळ
गच्चीत येय छाया
दारात कोरफड ही
रसदार पर्ण छाया
रचतो विटा शहाणा
लपते विटेत छाया
व्यापार भावनांचा
करते जपून छाया
कसला विटाळ सांगा
जर सोवळ्यात छाया
मी संयमी ‘सुनेत्रा’
सांगेल आज छाया
आभाळ मेघ छाया
पाऊस देह छाया
रानात ऊस नारळ
गच्चीत येय छाया
दारात कोरफड ही
रसदार पर्ण छाया
रचतो विटा शहाणा
लपते विटेत छाया
व्यापार भावनांचा
करते जपून छाया
कसला विटाळ सांगा
जर सोवळ्यात छाया
मी संयमी ‘सुनेत्रा’
सांगेल आज छाया