खरे काय आहे बरे काय आहे
कळावे तुला रे बरे काय आहे
तुला पाहिले मी तुला ऐकले मी
तरी जाणले ना भले काय आहे
गुपिते मनाची जुनी रेखताना
जरा अनुभवावे नवे काय आहे
नसे तू नसे मी नियंता इथे रे
घ्यावा कुठे काय आहे कसा शोध
किती मोह तुजला उणे शोधण्याचा
अता अधिक शोधू खुले काय आहे
इथे पूर्ण नाही कुणाचेच काही
तरी आस शोधे पुरे काय आहे
इथे आवडे ते करावे भरावे
नियम हाच जाणा नवे काय आहे
वृत्त – ल गा गा, ल गा गा, ल गा गा, ल गा गा.
3 responses to “खरे काय आहे – KHARE KAAY AAHE (what is true)”
छान गझल ….
गेयता आणि शब्दयोजना विलोभनीय …..
वाह वा !
कुणाचा सलोखा .. कुणाची टवाळी ..
रडायास लावी .. हसे काय आहे ।
THANK YOU