गुणानुराग – GUNANURAAG


रुबाई … शिशिर
शिशिर ऋतूच्या प्याल्यामध्ये रस भरते सृष्टी
तपोलीन पण ऋतू शिशिर हा नासाग्री दृष्टी
धुके लपेटून साकी गाते देण्या त्याला काही
नकोस नाकारू सौंदर्या ओंजळ भरून वाही

ग झ ल … गुणानुराग
श्रीमंती अंतरी रत्नत्रय भावी
मम समर्थ रक्षिण्या आत्मधर्म स्वामी

शिशिराच्या प्याल्यात रस भरते सृष्टी
ओंजळीत गोठवुन दशधर्म दावी

ऋतु शिशिर तपोलीन नासाग्री दृष्टी
आस्थेला बाजु ना उजवी वा डावी

गुणानुराग गाई क्षमाशील भूमी
वातचक्र फिरवण्या जलदांच्या गावी

वलयांकित हिमनेर सुचिपर्णी गात्री
घुंगूर रव निर्झर तट गुरे चरावी

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.