भूतकाळ मम अतिशय सुंदर
वर्तमान पण सावध सुंदर
पावसात भिजले तन मन वन
चिंतनात मधु घट भर सुंदर
फुल गुलाब लाल धवल फुलले
हस्त कमल गुण जल धन सुंदर
द्रव्य क्षेत्र मंगलमय वर्षा
नाम स्थापना चंदन सुंदर
सूर्य किरण कोवळे पान जणु
पुनव चांदणे शशधर सुंदर
मधुर पक्व फळ करात नाती
सावधान शुभ ओंजळ सुंदर
भाव अर्घ्य वाहते ‘सुनेत्रा’
अंतरात तीर्थंकर सुंदर