तुझी स्वतःची कर्मे तुजला धरतील धारेवरती
नाचवून निःकाचित कर्मे फळतील धारेवरती
सुधारेन मी पुट्पुट अस्फुट बुडबुडा पाण्यावरचा
असे बुडबुडे सुकून ओठी अडतील धारेवरती
शब्द परजुनी तप्त विळीसम शेरात प्रकटता झणी
जीव निगोदी सुटण्यासाठी उडतील धारेवरती
तीन शेरांचे मुक्तक.