टिकटिकणारे घड्याळ काटे चिदानंद चिद्रूप
शांत जिनालय मूर्त अंतरी मंदिर स्थानक स्तूप
शिवार वावर रान शेत अन जमीन गझलांकीत
पाखडती घन शब्द अक्षरे हस्तामधले सूप
रुजण्यासाठी उपादान अन निमित्त जुळता योग
तडाग तीरी धोंडयावरती आत्मा बीजस्वरूप
कैद भावना भ्रमर मनातिल मिटूनी नयन दले
कैक काफिये गोळा झाले फार रगड वा खूप
साय दही घुसळून सुनेत्रा येते वर नवनीत
कढवुन पात्री आंचेवरती गाळ तयातिल तूप