In this ghazal the poetess says, ‘My exsistance is in every beautiful thing; it is in still and clean water pond and it is in rose flower.
तडागात मी
गुलाबात मी
फुलात लपल्या
परागात मी
पौर्णिमेतल्या
प्रकाशात मी
स्वर-नुपुरांच्या
निनादात मी
प्राजक्ताच्या
सुवासात मी
आठवणींच्या
महालात मी
बिंब देखणे
सुनेत्रात मी