डबघाईचे दुकान माझे तरून आले
डबडबुनी दो अतिशय डोळे भरून आले
चमत्कार बघ कैसा झाला पंचम काली
डबडे बडवत अजाण बालक वरून आले
विपर्यास का कुणी करावा अर्थ लागण्या
डब घालाया घासुन भांडी घरून आले
एक पाहुणा जेव्हा आला मुक्कामाला
डबल बेडचे सिंगल झटपट करून आले
इंग्लीश हिंदी आणि कन्नड बोल “सुनेत्रा ”
डबरा भरण्या मराठीसही धरून आले