जगण्याचा उत्सव – JAGANYAACHAA UTSAV (festival of our own living)


मी माझ्या जगण्याचा उत्सव
तू माझ्या फुलण्याचा उत्सव

आठवणी रंगात बुडवुनी
प्रेमाने खुलण्याचा उत्सव

रिक्त जाहल्या धरणांमध्ये
तुडुंब जल भरण्याचा उत्सव

मोद वाटुनी मुदित होउनी
खळखळुनी हसण्याचा उत्सव

काव्यसरींच्या धारांमध्ये
चिंब चिंब भिजण्याचा उत्सव

मात्रावृत्त (८+८=१६ मात्रा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.