चित्र रेखिले चित्र बनविले बुद्धीपूर्वक भाव मनीचे
सहज सहज मम
त्यात प्रकटले ..
मुनि हृदयीचे उदक शिंपडुन वेलीवरती मात्रा मोजत
खुडता पाने
हात प्रकटले…..
श्रीगोंदा नवनगर जाहले यतिभंगाने यती कोपता
आठवणींची
अर्पुन ओंजळ ..
जिनवाणीचा सार प्राशुनी रक्षायाला वृक्ष वाटिका
मगरीचे दो
दात प्रकटले …..