ना विनोदी ना निगोदी नात माझी संवेदनशिल
आळशी ना बावळी ना जात माझी संवेदनशिल
मी न मिथ्या रीत सांगे आत्मघाती जाचणारी
मूळ फांद्या पुष्प बीजे पात माझी संवेदनशिल
काय सांगू अंद्धश्रद्धा पोसलेल्या मानवांनी
टाकते जीवांस जपण्या कात माझी संवेदनशिल
नित्य स्वाध्यायातुनी मी जाणले रे स्वरुप आत्म्या
लेकरे तत्वार्थसूत्री सात माझी संवेदनशिल
भजन कीर्तन विठ्ठलाचे पांडुरंगाची कहाणी
ऐक बाळा मम हमीची बात माझी संवेदनशिल