शिकार कसली एक शिकारी कुशल मी तर
जीव जपाया स्वर चारोळी कुशल मी तर
जिवंत सावज इतुके सुंदर मूर्तिदेवी
शशधरनेत्रा रत्न रुबाई कुशल मी तर
घडला आत्मा ऐकत गोष्टी गुज फुलांचे
मानवतेचा शूर पुजारी कुशल मी तर
धर्मासाठी देशासाठी शेर चतुर्थ
षट्कारास्तव ओळ आठवी कुशल मी तर
गझल हवी जर नाव ‘सुनेत्रा’ तूच लिह रे
मक्ता ठेका गात भैरवी कुशल मी तर