धुके मलमली पहाटवारा
कशास वळतो चऱ्हाट वारा
सुगंध ओला बनात भरुनी
हळूच चुंबे ललाट वारा
उधाण भरती समुद्र गर्जे
तिथे करी थयथयाट वारा
सुनेत्र झरती करुण रसाने
जिनेंद्र चरणी पिसाट वारा
कडेकपारी मधुन “सुनेत्रा”
झरा जणू बघ विराट वारा
धुके मलमली पहाटवारा
कशास वळतो चऱ्हाट वारा
सुगंध ओला बनात भरुनी
हळूच चुंबे ललाट वारा
उधाण भरती समुद्र गर्जे
तिथे करी थयथयाट वारा
सुनेत्र झरती करुण रसाने
जिनेंद्र चरणी पिसाट वारा
कडेकपारी मधुन “सुनेत्रा”
झरा जणू बघ विराट वारा