जिनालयाची वाटिका झाडे तरू वृक्ष वेली
जिना चंदनी सोपान जाई जुई दक्ष वेली
कुंभ कलश घडा हंडा भरूनी सांडते घागर
जिनायतना तोलाया खांब साही तक्ष वेली
रत्नत्रय चूल अग्नी चंदनाच्या बनी वारा
जिनवाणी माय आई मोगऱ्याच्या अक्ष वेली
यक्ष यक्षिणी देवता क्षेत्रपाल रक्षायाला
जिनशासनाची सत्ता सिद्धचक्री वक्ष वेली
जल गंध तांदूळ पुफ्फ दिव्व धुव्व चरू फळ अर्घ्य
जिनकांची गोलपीठी सोळाकार लक्ष वेली
ओनामासीधम सूत्र प्राकृतात स्वर एक अधिक
जिन मातृका पद तेची द्वादशांग पक्ष वेली
शुद्धोपयोग व्हावया शुद्ध भावांचे दे अर्घ्य
जिनदर्शनाला दारी पर्णांकीत कक्ष वेली