रंगबिरंगी छत्र्यांचे छत वाटेवरती
रांग दिव्यांची आहे तेवत वाटेवरती
पदपथ इतुका मस्त भोवती फुले वाटिका
ज्येष्ठातिल सर आहे नाचत वाटेवरती
शालीसम घन मृदुल मुलायम हिरवळीवरी
थेंब दवाचे फुलले शत शत वाटेवरती
टेबलखुर्च्यांवरी बसूनी घेऊ कॉफी
गप्पाटप्पा करता पाहत वाटेवरती
लाल गुलाबी हिरवे पिवळे निळे जांभळे
रंग मनातिल खुलतिल बरसत वाटेवरती
गझल मात्रावृत्त (मात्रा २४)