कलादालन तैलचित्रे कुशल करांची विशुद्ध किमया
कलादालन भाव भरल्या सजल करांची विशुद्ध किमया
चित्रांमध्ये या चाले मुक्त जरी रंगांची दंगल
कला दालन न्याय देण्या विमल करांची विशुद्ध किमया
ऊर्ध्व वेग घे जलद गती ओंजळ भरली हृदय मंदिरी
कलादालन ग्राम नगरी कमल करांची विशुद्ध किमया
ध्येयवेडी ब्रम्हभूमी चैतन्याने सळसळणारी
कलादालन सरळ वर्षा अनल करांची विशुद्ध किमया
पंचमेरू अचल ऐंशी जिनालयांचे कळस कांचनी
कलादालन सहज उमटे धवल करांची विशुद्ध किमया