पंचोळी … घटना
घटना असुदे अथवा घट पट
त्यांस असावा प्रकृतिचा तट
मातीवर संस्कार करूनी घट संस्कारित
कुंभाराच्या हाताचा आकार झेलूनी
मृत्तिकेतले उपादान साकार जाहले…
तीन शेरांचे मुक्तक ..ग्रंथ
काल खेळली रंग लेखणी मस्त खरा
आज चाटुनी कोप नाचरा फस्त खरा
काय शिकविते गझल ओळखू सार बरे
मित्र जवळचा ग्रंथ सत्य आश्वस्त खरा
रंगवायला चित्र भविष्या भेट उद्या
आज रेखिते ऐवज अस्सल दस्त खरा