पुरुषार्थाची ओळख ओळख ;
निरहंकारी हसमुख ओळख .
अंतर ज्याचे निर्मल निर्मळ ;
बुद्धी त्याची तल्लख ओळख .
दिवा तेवतो भाव उजळण्या ;
तोच निरंजन अल्लख ओळख .
.
दहा दिशांचे वसन जयाचे ;
देव दिगंबर षण्मुख ओळख .
नऊ मोजण्या जिनायतन मम ;
मीच सुनेत्रा पारख ओळख .