मुक्तक.. १)पैरण
सूक्ष्म तंतूंची बनलेली ऐरण जाळीदार..
सूक्ष्म तंतूंची विणलेली पैरण जाळीदार…
सागवानी दार घराचे अंगण त्यावर छान..
सूक्ष्म तंतूंची रचलेली वैरण जाळीदार.
मुक्तक ..२)स्वच्छता
स्वच्छता असावी तना मनाची अन वचनांची,
स्वच्छता करावी स्वतः मनाची अन वचनांची.
भावना जयांची असेल सुंदर तर नात्यांची ..
स्वच्छता धरावी खुल्या मनाची अन वचनांची.